You are currently viewing संवेदनशील कलावंत (नटसम्राट नाना पाटेकर)…

संवेदनशील कलावंत (नटसम्राट नाना पाटेकर)…

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*संवेदनशील कलावंत* (नटसम्राट नाना पाटेकर)…

 

 

रुपेरी पडद्यावर त्यांचा चेहरा दिसला,

की पडदा राहत नाही फक्त पडदा..

तो होतो आक्रोशाचा आरसा,

आणि त्यांच्या डोळ्यांत पेटते अन्यायाविरुद्धची आग!

 

खर्जातला तो बुलंद आवाज,

संवाद नव्हे जणू अंगावर येणारी वीज,

एका कटाक्षाने शांतता चिरणारा,

एका शब्दाने अंतर्मन हलवणारे काळीज!..

 

कधी प्रहारचा कणखर योद्धा,

कधी क्रांतीवीरचा ज्वालामुखी,

तर नटसम्राटमध्ये जगताना

वेदनेलाही त्यांनी अभिनयाची भाषा दिली..

 

हसताना सहज,

रागावताना धगधगता अंगार,

आणि अश्रू दाटले की

संपूर्ण सभागृहाला नि:शब्द करणारा कलाकार!

 

पुरस्कारांनी गौरविलेले नाव

पद्मश्रीने सन्मानले कर्तृत्वाला,

पण माणुसकीच्या वाटेवर चालताना

त्यांच्या मनातला कलावंत अधिक मोठा झाला..

 

शेतकऱ्याच्या दुःखात अस्वस्थ होऊन

मदतीचा हात त्यांनी पुढे केला,

नाम फाउंडेशनच्या कार्यातून

उजाड आयुष्यांना आशेचा किरण दिला..

 

अभिनयाला सलाम, कर्तृत्वाला मुजरा

आणि संवेदनशील मनाला मनापासून प्रणाम..

नाना पाटेकर म्हणजे केवळ नव्हे नटसम्राट,

तर कलेतून आणि कृतीतून माणुसकी जपणारा संवेदनशील कलावंत!

 

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा