You are currently viewing जुनी डायरी

जुनी डायरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जुनी डायरी*

 

काय असतं….

या जुन्या डायरीत…

टाकवत नाही,सोडवत नाही…

विसरत तर…

मुळीच नाही….

जेव्हाही लागते हाती…..

पंचप्राण ह़ोतात गोळा…

शब्दन् शब्द वाचायला…

जे अनेकदा वाचून झालेत….

अगदी पाठ का म्हणा ना….

डायरी….सखीच जणू

जिवाभावाची…..

प्रेम,विरह,ओढ….सर्व साक्षीदार..भावभावनांची…

कुणालाच न सांगता येणारे…

हळूवारपणे उतरवले तिच्यावर…

हसली माझ्यासवे…रडलीही कितीकदा….

कधी मनाचं गूज ऐकून गोड स्मितही……

अल्लड वय ते किशोरी….

तरूण ते प्रौढ….

सगळा शब्दप्रवास तिने …

अनुभवलाय माझ्यासोबत….

कविता संपली की….दोन रेघा

कधी ईवलंसं फूल काढलं की डायरीही मुक्त हसे…..

माझं गुपीत जणू कळे तिला….

काळाबरोबर माझ्यासारखीच

ती प्रौढ,अनुभवी झाली….

वैचारिक पात्रता, प्रगल्भता

आली लेखणीत…..

फुलंपानं,प्रीतगीत..विरहाची बोचही काहीशी बोथट….आताशा…

आता ती कधीकधीच…जवळ यायची…सुचलं काही तर…. पण जवळ असायचीच….

नवीन लेखनमाध्यमांनी जरा दुरावली…..पण आजही तिला सुंदर जपलेलं…

ती तिची ओढ..ते भावनेने ओथंबून वाहणारे त्यावेळचे शब्द….आजही लिहिण्याची उमेद देते……

तिच्या त्या शब्दमाळल्या रुपावर

मी आजही तितकीच भाळलेली……!!

 

 

अरुणा दुद्दलवार@✍️

 

 

*संवाद मिडिया*

 

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

 

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

 

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

 

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

 

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

 

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

 

♦️ *आमची वैशिष्ट्ये*

▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम

▪️8 मजली इमारत

▪️कव्हर टेरेस

▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट

▪️प्रशस्त लॉबी

▪️24 तास पाण्याची सोय

▪️सीसीटीव्ही एरिया

▪️ओपन जीम

▪️अग्निसुरक्षा सिस्टीम

▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

 

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

 

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

 

*मग, वाट कसली बघताय ?*

 

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

 

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

 

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

 

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

 

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*

9730353333

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा