बैलपोळा म्हणजे बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण. प्रगतीशील शेतकरी पै. नरेश जगताप.
पुणे
वर्षभरात बैल शेतामध्ये काबाड कष्ट व घाम गाळून शेतकऱ्यांना मदत करत असतात बैला प्रति आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना अंघोळ घालून, शिंगणा रंग देऊन, बाशिंग बांधून,झुली घालून त्याची आम्ही वाजत गाजत मिरवणूक काढतो आणि बैलांना पुरणपोळी ही खाऊ घालतों .
यावेळी पिंपळे गुरव येथील प्रगतशील शेतकरी नरेश जगताप म्हणाले की आमच्या बैल जोडीला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा ही मान मिळाला आहे हे आमच्या कुटुंबाचे खूप मोठे भाग्य आहे, परंतु आजकाल सिमेंटच्या जंगलामध्ये पशुधन पाळणे फार कठीण झालें आहे, पशुधनांना ठेवण्यासाठी नागरिकाकडे शहरा थोडीशी जागा शिल्लक राहिलेली नाही परंतु आज आम्ही हौसे खातर आणि या बैलामुळेच खूप मोठे झालो आहोत यांची आम्हा सर्वांना जाणीव आहे बैलांची कृतज्ञ म्हणून आम्ही बैलांना वर्षभर कोणतेही काम देता हौसे खातर पाळत आहोत आमच्या घरातील मुले व महिला त्यांची काळजी घेत असतात आमची नातवंडे स्वतः बैलांना धरतात परंतु ते काहीही करत नाहीत त्यामुळे कुटुंबाचे आणि आमच्या बैलांचे घट्ट खूप नाते निर्माण झाले आहे या भावनिक नात्यामुळेच आम्ही त्यांना विकू शकत नाही परंतु त्यांना सांभाळणे कठीण झाले असल्याची भावना शेतकरी नरेश जगताप यांनी यावेळी व्यक्त केली
या वेळी नरेश जगताप, सौरभ जगताप, कुनाल जगताप गौरव जगताप,ओंमकार जगताप, सुमित जगताप,दत्ता जगताप श्वेता जगताप, वृशाली जगताप इत्यादी घरातील सदस्य उपस्थित होते.
