आठवणीतील नाना
सुमारे १५ वर्षांपूर्वीची गोष्ट… नाना पाटेकर फोंडाघाटमार्गे मालवणला जात होते. नेहमीप्रमाणे फोंडाघाटातील वाहतूक कोंडीत त्यांची गाडी अडकली.
समोरच परुळेकर यांचे हॉटेल होते. नानांनी तेथे मिसळ आणि वडा-पाव घेतला. त्या वेळी हॉटेलमध्ये असलेल्या पांडू नांचेला त्यांनी आवर्जून धन्यवाद दिले.
नाना फोंडाघाटात आले आहेत, ही बातमी क्षणात सर्वत्र पसरली. मीही त्यांना भेटण्यासाठी गेलो. नानांनी माझ्या हातात हात दिला आणि सहज म्हणाले, “फोंडाघाट अप्रतिम घाट आहे. हा घाट विकसित करायला पाहिजे.”
त्यांच्या या साध्या शब्दांनी मनाला स्पर्श केला. एवढा मोठा अभिनेता असूनही त्यांच्यातील साधेपणा आणि माणुसकी त्या दिवशी जवळून अनुभवता आली.
त्यांच्यासोबत त्यांचा जर्मन शेफर्ड कुत्राही होता. नानांनी त्याच्यासाठीही पाव आणि त्याचे खाद्य मागवले. माणसांप्रमाणेच आपल्या मुक्या जीवाचीही काळजी घेणारा हा संवेदनशील माणूस…
आज नानांची आठवण झाली आणि त्या जुन्या प्रसंगाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
धन्य ते नाना पाटेकर आणि त्यांची साधी, मनाला भिडणारी माणुसकी!
