You are currently viewing जि.प.शाळा नं. 6 भटवाडी येथे “जन आरोग्य” तपासणी शिबिर  

जि.प.शाळा नं. 6 भटवाडी येथे “जन आरोग्य” तपासणी शिबिर  

जि.प.शाळा नं. 6 भटवाडी येथे “जन आरोग्य” तपासणी शिबिर

सावंतवाडी

प्रभाग क्र. 1 भटवाडी शाळा न. 6 मध्ये मध्ये महिला बालकल्याण सभापती दिपाली दिलीप भालेकर यांच्या पुढाकाराने प्रभाग 1 मधील नागरिकांची “जन आरोग्य “तपासणी शिबिर शुक्रवार दिनांक 9 /10 /2026 रोजी दुपारी तीन वाजल्यापासून आयोजित केली आहे
त्यात नागरिकांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या चाचण्या केल्या जाणार आहेत तरी या शिबिराचा लाभ भटवाडी
बाहेरचावाडा येथील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांनी केले आहे
ही तपासणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या माध्यमातून होणार आहे तसेच तपासणी ही मोफत होणार आहे त्यात हिमोग्लोबिन,कॅल्शियम,कोलेस्ट्रॉल, किडनी, लिव्हर इत्यादी तपासण्या होणार आहेत.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा व आपले आरोग्य सुदृढ आहे का नाही ते पाहावे

प्रतिक्रिया व्यक्त करा