You are currently viewing कॅमेर्‍यासोबतच…माझं जगणं

कॅमेर्‍यासोबतच…माझं जगणं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कॅमेर्‍यासोबतच…माझं जगणं..*

 

रोजच्या जगण्याचा कॅनव्हास

कॅमेर्‍यासोबतच.. रंगीत करतो

चित्ररूपात चिरस्थायी दस्तऐवज

प्रतिबिंबातून ..कुंचला फिरवतो

 

गतस्मृतीचा गुंजारव लेन्समधून

नात्यातही..अनभिज्ञ बाधा होते

झाकोळलेलं साशंक व्यक्तीमत्व

बेमालूम..लोचनी उजळून येते

 

कॅमेराचा..जीव भाबडा

माझ्यातला..हिरो दाखवतो

उपमर्द जिव्हारी ..लागताच

पायरी ओळखून..मी जगतो

 

वाटत..आजही मला

उगाच या प्रतिबिंबात गुंतलो

घायाळ..अव्यक्त व्यर्थ भावनांना

वास्तवात..कवटाळत राहिलो

 

चौफेर..साराच भास

कसलाच..माझा दावा नाही

वास्तवात..जगता जगता

मृगजळापाठी..धावलो नाही

 

झरझरझर सरतो..हा काळ

आताश्या..कॅमे-याला समजु लागलं

आईचा चेहरा त्याने..माझ्यात जपला

कुणास ठाऊक ..तेच माझ्यात उरलं

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा