माणगावात ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ उद्या रक्तदान शिबिर
आयुष्यमान आरोग्य मंदिर व ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे संयुक्त आयोजन; सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिबिर
माणगाव
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर, माणगाव (प्राथमिक आरोग्य केंद्र) आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
माणगाव येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरात सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत हे शिबिर होणार आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित या उपक्रमात इच्छुक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रक्तदानासाठी येणाऱ्या इच्छुकांनी आरोग्य सहाय्यक सुहास गावडे (९४२२९७२८५५), ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे खजिनदार सिद्धार्थ पराडकर (९४२२९६७२४९) किंवा सचिव बाबली गवंडे (८३९०९०५२६९) यांच्याशी संपर्क साधावा.
