You are currently viewing खऱ्या गरजू व गरीब व्यक्तीला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली आर्थिक मदत

खऱ्या गरजू व गरीब व्यक्तीला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली आर्थिक मदत

खऱ्या गरजू व गरीब व्यक्तीला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली आर्थिक मदत

*भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे वाढदिवसानिमीत्त*

*या उपक्रमाबाबत नागरिकात समाधान*

वेंगुर्ले (वार्ताहर)

महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त वेंगुर्ले शहरातील खऱ्या गरजवंत व गरजू अशा ४ व्यक्तींसाठी प्रत्येकी ५ हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याचा उपक्रम भाजपाच्या माध्यमातून वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी राबविला.

वेंगुर्ले शहरातील कुटुंबाकडे उत्पन्नाचे साधन नसलेल्या अशा शहरातील ४ जणांची निवड नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केली. यात आजाराने पिढीत असलेल्या खालचीगावडेवाडी येथील अशोक गजानन गिरकर, अंध व अपंग असलेले नाना मसुरकर, कुटुंबाचा चरीतार्थ चालविण्याचे साधन नसलेल्या व दोन अविवाहित मुलांना मानसिक आजार असल्याने कुटुंबाचा चरीतार्थ चालविणे कठीण झालेल्या अनाथश्रमात रहाणाऱ्या बेबी कासकर, परबवाडा-मासुरा येथील रोझालीन फर्नाडीस यांचा कमवता माडपाडपी नवरा अल्बर्ट फर्नाडीस हे माडावरून पडून मृत्यू पावल्याने त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांची गरज ओळखून भाजपाच्या माध्यमातून वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी या सर्वाना त्यांच्या घरी जात प्रत्यकी ५ हजार रूपयांची आर्थिक मदत प्रधान केली.

या प्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब, जिल्हा उपाध्यक्ष प – सन्ना देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेट्ये, सदानंद गिरप, प्रितम सावंत, सुधीर पालयेकर, नगरसेविका आकांक्षा परब, काजल कुबल, रिया केरकर, शितल आंगचेकर, भाजपा वेंगुर्ले शहर शक्ती केंद्र प्रमुख किरण कुबल, भाजपाचे पदाधिकारी मनवेल फर्नाडीस, साई भोई आदीसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा