*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ मानसी बापट लिखित लज्जतदार पाककृती*
*चण्याचे सूप*
*साहित्य* भिजवलेले चणे 1 बाउल, 1 बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर जिरे पावडर मीठ आणि लिंबू रस 1 हिरवी मिरची (तुम्ही बारीक चिरून ही घालू शकता नाहीतर वाटताना ही)
*कृती* प्रथम चणे(हरभरे) भिजवून मग कुकर मध्ये शिजवून घेऊन मिक्सर ला पाणी घालून बारीक वाटून घेतले. मग त्यात एक चमचा जिरे पावडर लिंबू रस आणि चविनुसार मीठ घालून उकळून घेतले.
नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून सर्व्ह केले.
*अतिशय चविष्ट असे चण्याचे सूप तय्यार*
*सौ मानसी बापट बंगलोर*
