मुंबई : सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता व समाजोपयोगी कार्याची दखल घेत लोकलराजा टी.व्ही.चे मुख्य संपादक मा. श्री. भुजंगराव नागोराव सोनकांबळे यांना ‘इंडियन सोशल स्टार अवॉर्ड २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शौर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (रजि.), महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने या आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी भुजंगराव सोनकांबळे यांना सन्मानचिन्ह तसेच सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सामाजिक बांधिलकी, समाजसेवा, पत्रकारिता आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमधील त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आल्याचे सन्मानपत्रात नमूद करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना भुजंगराव सोनकांबळे यांनी सांगितले हा सन्मान माझ्या सामाजिक कार्याला नवी प्रेरणा देणारा असून भविष्यातही मी समाज हितासाठी अधिक जोमाने कार्य करित राहीन हा संकल्प भुजंगराव सोनकांबळे या ठिकाणी व्यक्त केला.
