*काव्यप्रेमी महाराष्ट्र साहित्य समूहाचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम काव्यरचना*
❤️मैत्री🌹
निथळ खळखळ
वाहते निर्मळ
गाते मंजूळ गाणे
या धारेवर
जीव सुखवाया
त्याचे समर्पिने
ना यावा खडक उरी
ना भासावी खोल दरी
बहरूनिया यावी
फुलदाणी ती
गंधित व्हावे
सुगंध नवे
झुळूक हवेची
थंड असावी
मंत्रमुग्ध करिता
मने रिझवावी
घाटमाथा
डोंगर दर्या अणं
हिरवळ माजुनी जावी
इथेच साऱ्या मित्रांसवे
कृष्ण बासरी गावी….
भूमिपुत्र वाघ.
