You are currently viewing फावला वेळ मिळता जरा

फावला वेळ मिळता जरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी बापट लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*फावला वेळ मिळता जरा*

 

फावला वेळ मिळता जरा

मागे वळून पाहते

माहेरच्या अंगणात मन

जाऊन ते पोचते।।१

 

लुटुपटू ची भांडणे

तू तू मी मी करत

दोन्ही भाऊ माझे

त्रास देत मला सतत।।२

 

आठवतं अजूनही

ते चोरून फिरणे

चिंचा बोरे आवळे तोडत

मनमुराद भटकणे।।३

 

फावला वेळ मिळता जरा

नातवंडे असतात साथीला

चल ना ग आजी म्हणत

खेळ शिकवतात मला।।४

 

छान जातो वेळ माझा

नातवंडांच्या साथीने

सेकंड इनिंग आम्ही दोघे

जगतो आहोत आनंदाने

जगतो आहोत आनंदाने।।५

 

*सौ मानसी बापट बंगलोर*

प्रतिक्रिया व्यक्त करा