You are currently viewing ओसरगाव तलावाखालून हजारो लिटर पाणी वाया; लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

ओसरगाव तलावाखालून हजारो लिटर पाणी वाया; लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

ओसरगाव तलावाखालून हजारो लिटर पाणी वाया; लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

चार दिवसांत गळती कायमस्वरूपी बंद करा; अन्यथा ग्रामस्थांसह शिवसेनेचे आंदोलन

ओसरगाव

सध्या सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावोगावी वनराई बंधारे उभारले जात आहेत. मात्र, ओसरगाव तलावाखालून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याची गरज असताना लघुपाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तलावांमध्येही अपेक्षेप्रमाणे पाणीसाठा झालेला नाही. अशा परिस्थितीत तलावाखालून पाणी सतत वाहून जात राहिल्यास भविष्यात तलावालगतच्या वाड्या-वस्त्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे संबंधित विभागाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन पाण्याची गळती कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
येत्या चार दिवसांत पाण्याचा अपव्यय थांबवून गळती कायमस्वरूपी बंद करावी. अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन शिवसेनेच्या वतीने संबंधित यंत्रणेविरोधात जोरदार आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. लघुपाटबंधारे विभाग, ग्रामपंचायत तसेच संबंधित यंत्रणेने याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा