*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नावाजत मला सारं गाव*
//886//
काव्ययात्री मी शेतकरी
दोस्ती केली *वरूणाशी*
तहान लागता जमिनीला
फटकून वागला माझ्याशी
//1//
जमिनीवरती मारून रेषा
शिकून घेतली बाराखडी
त्यावर बांधली सुंदर शाळा
नंतर शिकलो मी *मोडी*
//2//
धरून हात *शब्दांचा*
गाठली शाळा तालुक्याची
रचले काव्य *पहिले तेथे*
*बोबडी* वळली गुरुजींची
//3//
मार खाऊन येथेच्छ तेथे
वाट पकडली *गावाची*
नाही पाहिले नंतर तोंड
पोरगी गटवली गुरुजींची
//4//
डिग्री बिग्री काय कामाची
संसार म्हणजे *सारीपाट*
आदर्श ठेवून बहिणाबाईचा
ओव्या रचल्या *फटाफट*
//5//
टाकून गिरणी पिठासाठी
*बहिणाबाईचे* दिले नाव
सुट्टी मिळाली *जात्याला*
*नावाजत मला सारं गाव*
//6//
विनायक जोशी🖋️ ठाणे
2809/9324324157
