You are currently viewing तुझ्या एका थेंबासाठी

तुझ्या एका थेंबासाठी

*लेखक, कवी, पत्रकार ॲड रूपेश पवार लिखित भावस्पर्शी काव्यरचना*

 

*तुझ्या एका थेंबासाठी*

 

तुझ्या एका थेंबासाठी

महाराष्ट्रची झाली कोंडी

शेतकऱ्यांनी आरोळी फोडली

दुष्काळाने पिकांची माती झाली

तुझ्या एका थेंबासाठी।१।

 

माय मराठी मैलोन मैल

पायपीट करू लागली

पाण्यासाठी हासरी मुले

अगदी कोमेजून गेली

तुझ्या एका थेंबासाठी।२।

 

वैरणीला नाही पैशांची थैली

नाही गवताची पाती

गुरेढोरे विकाऊ झाली

दुधाची तहान कशीबर भगवावी

तुझ्या एका थेंबासाठी।३।

 

देणी देण्याची रक्कम नाही

आत्महत्येची मालिका सुरू झाली

ही पिढी संपण्याची भीती

आज इथे वाटू लागली

तुझ्या एका थेंबासाठी।४।

 

ओढ्याचे पाणी वाहणार कधी

धरणाची पातळी वाढणार कधी

पाटांमधली गाणी खळखळणार कधी

डोळ्यांची पाखरे सुकून गेली

तुझ्या एका थेंबासाठी।५।

 

तू येणार नाहीस म्हणून

तुझी ही कहाणी राजकारणात बरबटली

अशी शंका येऊ लागली

चाहूल लागता तुझी मने तृप्त झाली

तुझ्या एका थेंबासाठी।६।

 

तू असाच येऊन,

राहून जा चार महिन्यांसाठी

इडापीडा घालवून जा आमच्यासाठी

नतमस्तक शेतकरी तुझ्या पायाशी

तुझ्या एका थेंबासाठी।७।

 

रुपेश पवार

प्रतिक्रिया व्यक्त करा