*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*
*”सूर्यनमस्कार सूर्योपासना “*
करू सूर्य देवास साष्टांग नमन
देई आरोग्य संस्कार करी संपन्न!!धृ !!
रवी सर्व तारांगणाचा राजा महान
सर्वाधिक ऊर्जा देई असे तेजवान!!1!!
सूर्य प्रगती पराक्रमाचे आहे चिन्ह
देई वैभव राखतो सामर्थ्यवान!!2!!
ज्योतिर्मय दाहक परि संजीवक
चैतन्य मूर्ती तरुणारूण किरण!!3!!
ब्रह्मांड सार सर्वस्वाची देई जाण
पृथ्वीवरचा परमात्मा असे हिरण्य!!4!!
विविध वर्णांची गुणधर्मांची किरणं
देई वर्षा सौष्ठव जीवनसत्व धान्य!!5!!
आहे सत्तारूपी देतो प्रकाश सर्वत्र
रोगजंतू करी नष्ट ठेवी प्रसन्न!!6!!
देतो प्रेरणा चेतना परमात्मा ज्ञान
वेद गायत्री मंत्राची देवता अनन्य!!7!!
ओम् मधून प्रगटे वाणी उच्चारण
देई प्रकाश प्रज्ञा प्रतिभा शुद्धता ज्ञान!!8!!
दिव्य तेजाने झगमगते सदा भुवन
अणू रेणू उजळे देई अमृतकण!!9!!
अर्घ्य देऊ भास्करां करू नित्य नमन
उद्गाता विधात्याचे सदा मानु ऋण!!10!!
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.