You are currently viewing 2 ऑक्टोबरला सावंतवाडीत महात्मा गांधी-लाल बहादूर शास्त्री जयंती व सत्कार समारंभ

2 ऑक्टोबरला सावंतवाडीत महात्मा गांधी-लाल बहादूर शास्त्री जयंती व सत्कार समारंभ

2 ऑक्टोबरला सावंतवाडीत महात्मा गांधी-लाल बहादूर शास्त्री जयंती व सत्कार समारंभ

सावंतवाडी

शुक्रवार दि. 2 ऑक्टोबर रोजी स्व. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने पुष्पांजली व आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याचबरोबर सावंतवाडी शहराचे विद्यमान नगरसेवक व काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते *तौकीर शेख* यांची जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या शिफारसीने महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष पदी नेमणूक झाली आहे. त्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम *उभा बाजार, ज्वेलरी पेठ, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान, राजेंद्र मसुरकर यांचे कार्यालय, सावंतवाडी येथे सकाळी 11 वाजता* होणार आहे.

या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक, तालुका कार्यकर्ते, महिला काँग्रेस, सेवा दल, NSUI व अल्पसंख्यांक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र प्रभाकर मसुरकर, रवींद्र मापसेकर, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते एडवोकेट. दिलीप नार्वेकर, महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सौ. साक्षी वंजारी व शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. सुमेधा सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा