You are currently viewing कुडाळ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत साळगाव हायस्कूलचे यश

कुडाळ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत साळगाव हायस्कूलचे यश

कुडाळ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत साळगाव हायस्कूलचे यश

कुडाळ

श्री वास विद्यालय माणगाव चा मैदानावर कुडाळ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते 14 वर्षे 17 वर्षे 19 वर्ष अशा विविध वयोगटात मुला मुलींच्या फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले यात 14 वर्ष मुले 17 वर्षे मुले यांनी सहभाग घेतला 14 वर्षे वयोगटात उपांत्यपूर्व सामन्यात नाथ पै विद्यालय कुडाळ यांना हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला उपांत्य फेरीमध्ये माणगाव संघावर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम सामन्यात डॉन बॉस्को या संघावर विजय मिळवत *तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला* या संघामध्ये अनंत मांजरेकर वेदांत घाग कुणाल सावंत चिन्मय सावंत साईश सावंत अर्णव पेडणेकर धोंडू बावदाने वेदांत मांजरेकर गौरव मांजरेकर वेदांत साटेलकर साटेलकर राज दाभोलकर हेरंब घाडी सुधांशू धुरी वसंत घाडी या खेळाडूंनी सहभाग नोंदवला सदर संघाची *जिल्हास्तरावर निवड झाली* या संघासाठी क्रीडा शिक्षक विश्वास धुरी सहाय्यक शिक्षक विद्यानंद पिळणकर यांचे मार्गदर्शन लाभले पालक उमेश मांजरेकर यांनी दिवसभर उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले विजय संघाचे संस्था अध्यक्ष मुकुंद धुरी सचिव प्रदीप प्रभू तेंडोलकर व सर्व संस्था संचालक मुख्याध्यापक सलीम तकिलदार यांनी अभिनंदन केले

प्रतिक्रिया व्यक्त करा