जिल्ह्यात आर.पी.आय.(आठवले)पक्षाचे संघटन मजबूत करण्याचा बैठकीत निर्धार!
सावंतवाडी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम.डॉ.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे जिल्ह्यात युवक,महिला व इतर विविध आघाड्यांसह तालुका व गाव शाखा निर्माण करून संघटन मजबूत करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
आर.पी.आय.(आठवले)पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी यांची नुकतीच सावंतवाडीत मॅंगो हॉटेलमध्ये बैठक पक्षाचे राज्य सहसचिव-रमाकांत जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष -अजितकुमार कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली,यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस -प्रकाश कांबळे,जिल्हा खजिनदार-आनंद पेंडूरकर,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा दोडामार्ग च्या नगरसेविका -सौ.ज्योती रमाकांत जाधव,जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा-सौ.जागृती जयंद्रथ सासोलकर,पक्षाचे कुडाळ तालूकाध्यक्ष-सतीश कदम,मालवण तालूकाध्यक्ष-दिपक कदम,दोडामार्ग तालूकाध्यक्ष-रामदास कांबळे उपस्थित होते.
