You are currently viewing अपराध….नाही मी केला…!
Oplus_16908288

अपराध….नाही मी केला…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अपराध….नाही मी केला…!*

 

तसा कुठलाच अपराध

आठवत.. नाही मला

गाणी.. विसरून गेलो

सांगितलं.. तसं कवितेला..

 

माझ्या मनातलं गाणं

गाता.. येत नाही

चाल वाकड्यात.. शिरताच

कागदावरही ..उतरत नाही..

 

गाण्याला सोसूनही सूरात

गाता …येत नाही

आभाळ हाताशी आलं

गळ्यांतून उतरत नाही.

 

सध्यातरी मनाशीच गुणगुणतोय

गाण्याला… बंदीशी नाही

अपराधाची सजा ..ह्दयाला

हमी ..गायकीची नाही…

 

जगतोय.. मी गाणं

कसं …लोटू दूर

विसरून जाईलं.. गाणं

म्हणून उतरोतय ..कागदावर..

 

स्वयमेव ..ध्वनी हुडकून

अवघ्या दिशांना टाळतो

आतला अनाहत ध्वनी

गाण्यातून ..जोडण्यास झुरतो..

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा