You are currently viewing ईश्वरपुरात सार्वजनिक गणेश मंडळाचे देखावे सुरू; भाविकांची गर्दी 
Oplus_16908288

ईश्वरपुरात सार्वजनिक गणेश मंडळाचे देखावे सुरू; भाविकांची गर्दी 

ईश्वरपूर / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

ईश्वरपूर शहरांमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सार्वजनिक गणेश मंडळामध्ये उत्साहाच वातावरण दिसून येत आहे. शहरालगत असलेल्या गावातील खेडोपाड्यातील नागरिक ईश्वरपूर शहराला भेट देत असल्यामुळे येथील मंडळांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे,

ईश्वरपूर शहरात साडेतीनशे हून अधिक गणेश मंडळे आहेत, त्यातील काही मंडळे रौप्य महोत्सवी तर काही मंडळ अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहेत, ईश्वरपूर येथे गणेश मंडळाचे देखावे नागरिकांना पाहण्यासाठी खुले झाले असून सामाजिक जाणिवेतून सामाजिक संदेश देणाऱ्या पारंपारिक देखाव्या वर जास्त भर दिला गेला आहे, तर काही मंडळांनी जिवंत देखावे सादर केले आहेत, तसेच सुंदर व आकर्षक सुबक मूर्ती बसवण्या कडे ही काही मंडळांचा कल दिसून येत आहे, 14 फुटी 21 फुटी अशा गणेश मूर्ती गणेश भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

यावेळी ईश्वरपूर नगर परिषदेने प्रत्येक मंडळांची नोंदणी करून घेतली आहे, तसेच वाहतूक नियमांच्या अधीन राहून वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने सर्व मंडळांनी आपली मंडळी स्थापन केली आहेत.

येथील भाजी मार्केट गणेश मंडळ ट्रस्ट या मंडळाची स्थापना सन 1935 रोजी झाली असून सर्वात पुरातन मंडळ असल्याचे मंडळाकडून सांगण्यात येते, तेथेच असणारे प्राचीन गणेश मंदिर यामुळे या मंडळास विशेष महत्त्व आहे, या मंडळाची 21 फूट उंच गणेश मूर्ती पाहण्यासाठी आभार वृद्धांची गर्दी होत आहे, तेथीलच सिद्धटेक गणेश मंडळ ब्राह्मणपुरी चा राजा यांचीही यावर्षीची गणेश मूर्ती लक्षवेधी ठरली आहे.

त्याचबरोबर ललकार गणेश मंडळ, सिद्धिविनायक गणेश मंडळ, लाल चौका चा राजा, ऊरुण ईश्वरपुर चा महाराजा छत्रपती संभाजी महाराज गणेश मंडळ, डॉ.मा.आण्णासाहेब डांगे गणेश मंडळ, वनश्री गणेश मंडळ ईश्वरपूर चा सम्राट, त्यांच्या गणेश मूर्ती व सजावट विशेष लक्ष वेधून घेत आहे.

काळा मारुती चौक येथील जय हनुमान गणेशोत्सव मंडळ यांनी दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक जिवंत देखाव्या वर भर दिला आहे, क्या देखाव्या पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे,

शिवभवानी गणेशोत्सव मंडळ यांनी यावेळी मिरर चा देखावा सादर केला आहे, त्यांची गणेश मूर्ती ही विशेष लक्षवेधी आहे.

पारंपारिक देखाव्यांसाठी काही प्रसिद्ध असलेल्या मंडळांनी यावेळी समाज प्रबोधनात्मक देखावे सादर केलेले आहेत.

येथील यल्लामा चौक परिसरातील बाल गणेश मंडळ यांनी पारंपारिक वासुदेवाचा देखावा सादर केला आहे.

श्री गणेश मंडळ यांनी पारंपारिक भारुड हा देखावा सादर केला आहे,

तसेच कलासागर गणेश मंडळ यांनी अन्न व औषध प्रशासन वर आधारित अन्नभेसळ हा देखावा सादर केला आहे, अन्न औषध प्रशासनाच्या चालू असलेल्या धडक कारवाई मुळे हा देखावा विशेष लक्ष वेधून घेत आहे.

शहरा बरोबरच उरुण परिसरात शिवाजी चौक जाधव गल्ली भोसले पाटील गणेश मंडळ यांचे देखावे गर्दी खेचत आहेत. त्याच बरोबर काही औषध गणेश भक्तांनी आपल्या घरातही सामाजिक देखावे केलेले आहेत.

शिवाजी चौक येथील जलधारा देखावा, जाधव गणेश मंडळांचा सर्जिकल साहित्य पासून तयार केलेला गणपती, छत्रपती संभाजी महाराज गणेश मंडळाची लक्षवेधी मूर्ती भोसले पाटील गणेश मंडळांचा आशीर्वाद देणारा गणपती, न्यू खंडेश्वर गणेश मंडळाचा पेठ येथील प्रसिद्ध खंडोबा पालखी देखावा, ऊरूणावती गणेश मंडळाचा देखावा तसेच पैलवान संग्राम पाटील, मूषक खेळ, सुवर्ण पाटील, बारा बलुतेदार व तेजस देसाई यांनी घरगुती उभारलेला नवदुर्गा या घरगुती देखाव्याला सुद्धा गणेश भक्त गर्दी करत आहेत.

ईश्वरपूर शहरात शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न करता भक्तीमय वातावरणात गणेश उत्सव चालू आहे. गणेश भक्तांनी या देखाव्यांचा लाभ घ्यावा असे ईश्वर पुरातील सर्वच गणेश मंडळांकडून सुचित करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा