You are currently viewing आम. निलेश राणे यांनी संजू परब यांच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन
Oplus_16908288

आम. निलेश राणे यांनी संजू परब यांच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन

सावंतवाडी :

शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या मडूरे-परबवाडी येथील निवासस्थानी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार श्री. निलेश राणे यांनी भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी आमदार श्री. निलेश राणे यांनी गणरायाची मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, मडूरे सरपंच उदय चिंदरकर, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परब कुटुंबीय आणि स्नेही उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा