You are currently viewing महिन्यातून किमान एकदा सागरी स्वच्छता अभियान राबवा : प्रमोद कामत

महिन्यातून किमान एकदा सागरी स्वच्छता अभियान राबवा : प्रमोद कामत

महिन्यातून किमान एकदा सागरी स्वच्छता अभियान राबवा : प्रमोद कामत

कुणकेश्वर बीचवर स्वच्छता मोहिमेत २० बॅग कचरा संकलित; नागरिकांच्या सहभागातून ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’चा संदेश
कुणकेश्वर येथे सागरी स्वच्छता अभियान

देवगड (प्रतिनिधी) :

केंद्रीय सागरी स्वच्छता अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन महिन्यातून किमान एकदा स्वच्छता अभियान राबवावे. किनारपट्टीचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक आहे. स्वच्छतेचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.
कुणकेश्वर येथे आयोजित सागरी स्वच्छता अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, केंद्रनिरीक्षक डॉ. सरस्वती, सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी निलेश जगताप, जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्य सलोनी तळवडेकर, श्रीनिवास कांदळगावकर, प्रवीण कानकेकर, विजय तेंडुलकर, कुणकेश्वरचे माजी सरपंच महेश ताम्हणकर, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली आदी उपस्थित होते.
यावेळी मिठमुंबरीचे सरपंच बाळकृष्ण गावकर, डॉ. घोगरे, संजय आचरेकर, ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग शेडगे, गुणवंत पाटील, स्वच्छता विभागाचे विनायक धुरी, वैशाली मेस्त्री, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, देवगड कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी सागरी स्वच्छता अभियानाचा उद्देश व महत्त्व स्पष्ट केले. ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, स्वच्छतेचे महत्त्व सातत्याने नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून, अशा उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कुणकेश्वर बीचवर २० बॅग कचरा संकलित

अभियानाच्या निमित्ताने मान्यवर, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी एकत्रितपणे कुणकेश्वर बीच परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेत तब्बल २० बॅग कचरा संकलित करण्यात आला. समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासोबतच परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेत ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’चा संदेश दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा