You are currently viewing माझ्याचं शब्दांची…वकीली..

माझ्याचं शब्दांची…वकीली..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माझ्याचं शब्दांची…वकीली..!!*

 

उत्साह शिगेला..पोहचताचं

रूग्णवाहिका शब्दांची निघायची

परवशता….पाश दैवे

घाई..शब्दांना तिर्थाटनाची..

 

शब्दप्रेमांत पडू..नकोस

हिरमोड तुझाच होईल

मौन सज्जनांचे धोकादायक

शब्दपेरणीचं दुबार संकट येईल

 

दातृत्वाचे पंख शब्दांपुढे

कधीच…पसरू नकोस

वंशद्वेषाचे..आरोप होतील

सुसंस्कृतीचा ठेका घेऊ नकोस

 

शब्द माझे..वकीलपत्र

घेऊनच वावरत असतात

अहंकार..डेसिबलचा घेऊनच

माझ्यावर आरडाओरड करतात

 

निर्लेखनावरून..वाद माझा

मुसद्देगिरी करू..लागलो

मूल्यमापनाला आवर घातला

वकीलपत्र…देऊन फसलो..

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा