You are currently viewing पाच वर्षे जपलेले नारळाचे झाड वन्यप्राण्यांनी केले उद्ध्वस्त

पाच वर्षे जपलेले नारळाचे झाड वन्यप्राण्यांनी केले उद्ध्वस्त

पाच वर्षे जपलेले नारळाचे झाड वन्यप्राण्यांनी केले उद्ध्वस्त

गणेशप्रसाद गवस दोडामार्ग यांचा व्यक्तिगत मालकीचा नारळाच्या झाडाचा वन्यप्राण्यांकडून फडशा; नुकसानभरपाई आणि वन्यजीव व्यवस्थापनावर सवाल

दोडामार्ग :

पाच वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यात लावलेले आणि आता सहाव्या वर्षात पदार्पण केलेले नारळाचे झाड वन्यप्राण्यांनी उध्वस्त केल्याची घटना घडली. हे झाड गणेश प्रसाद गवस यांच्या व्यक्तिगत मालकीचे होते. गेल्या रात्री वन्यप्राण्यांनी झाडाची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर झाडाचा फोटो काढताना वन्यजीव व्यवस्थापनाच्या धोरणाबाबत अनेक प्रश्न मनात येत असल्याची भावना गवस यांनी व्यक्त केली. वन्यप्राण्यांना जंगलात पुरेसा नैसर्गिक आहार उपलब्ध व्हावा, यासाठी साग, बांबू, किंजळ आदी वृक्षांची लागवड केली जाते. मात्र, तृणभक्षी वन्यप्राण्यांना आवश्यक खाद्य उपलब्ध होईल, अशा वनस्पतींची लागवड आणि जंगलातील नैसर्गिक अधिवास व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
वनविभागाच्या नियमांनुसार नागरिकांनी झाड तोडल्यास कारवाईला सामोरे जावे लागते. मात्र, वन्यप्राण्यांकडून शेतकरी किंवा नागरिकांच्या फळझाडांचे नुकसान झाल्यास त्यांना योग्य न्याय आणि नुकसानभरपाई मिळते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या मालकीच्या झाडांचे वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान रोखण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई मिळावी, अशी मागणी गवस यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा