You are currently viewing गणेशोत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांना शिधा वाटप

गणेशोत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांना शिधा वाटप

 *युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून रविवारी साईदरबार हॉल, वेंगुर्ला मध्ये उपक्रम*

वेंगुर्ला :

गणेशोत्सव हा आनंद, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा सण आहे. या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने दिव्यांग बांधवांसाठी शिधा वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. युवा नेते तथा भाजप महाराष्ट्रचे विशाल प्रभाकर परब यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता साईदरबार हॉल, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिव्यांग बांधवांना दैनंदिन गरजेच्या जीवनावश्यक वस्तूंचा शिधा गेली कित्येक वर्षे उपलब्ध करून देत त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे.

सामाजिक कार्याच्या माध्यमातून गरजू घटकांना मदतीचा हात देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि सण-उत्सवांच्या आनंदात त्यांना सहभागी करून घेणे, या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दिव्यांग बांधवांना आधार, सन्मान आणि आपुलकी’ या भावनेतून होणाऱ्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवाच्या सामाजिक संदेशाला अधिक व्यापक स्वरूप मिळणार आहे.

दिव्यांग बांधवांप्रती समाजाची संवेदनशीलता वाढावी आणि त्यांच्या सुख-दुःखात समाजाने सहभागी व्हावे, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. या शिधा वाटप कार्यक्रमास दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या मार्फत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा