You are currently viewing जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्लाचे सुयश

जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्लाचे सुयश

जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्लाचे सुयश

वेंगुर्ले

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी आयोजित जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा दिनांक 9 सप्टेंबर रोजी ओरोस या ठिकाणी पार पडली.यामध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,वेंगुर्ला या शाळेतील इयत्ता नववीतील विद्यार्थी श्रेयश कृष्णा साटेलकर याने 17 वर्षांखालील मुले या गटातून 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. तर इयत्ता सातवीतील विद्यार्थी हर्षांक रमेश टेमकर याने 200 मीटर फ्री स्टाइल मध्ये द्वितीय आणि 100 मीटर फ्री स्टाईल मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला.या दोन्हीही जलतरणपटूंची सांगली येथे होणाऱ्या विभागस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख,सचिव दत्तात्रय परुळेकर,संचालक प्रशांत नेरुरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा