You are currently viewing डॉ. अपूर्वा बासूर यांनी स्वीकारली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सीइओ पदाची सूत्रे

डॉ. अपूर्वा बासूर यांनी स्वीकारली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सीइओ पदाची सूत्रे

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून स्वागत

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांनी प्रशासकीय कामकाजाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यात त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील खातेप्रमुखांनी तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

डॉ. अपूर्वा बासूर या २०२२ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी असून, प्रशासकीय सेवेत आल्यानंतर त्यांनी वाशिम येथे अतिरिक्त सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा