*सर्वांनी वातावरणीय हवेची गुणवत्ता व स्वच्छ हवा ठेवण्यासाठी आरोग्यदायी आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत – डॉ. पुरंधर नारे*
*फोंडाघाट महाविद्यालयात राष्ट्रीय स्वच्छ हवेचा दिवस संपन्न*
फोंडाघाट
भूगोल विभागाच्या वतीने, महाविद्यालयात आज हा दिवस राष्ट्रीय स्वच्छ हवेचा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
प्रास्ताविक आणि मार्गदर्शन करताना भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजाराम पाटील म्हणाले,
पर्यावरणामध्ये विविध साधन संपत्ती, हवामान, आरण्यांचे वितरण हे महत्त्वाचे घटक आहेत. प्रदूषण हा प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडित असणारा घटक आहे. रस्त्यावरील धूळ, वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, घरगुती इंधन, बांधकाम साहित्य, प्लास्टिक जाळणे, कचरा उघड्यावर जाळणे, विविध प्रकारच्या उद्योगधंद्यामधून बाहेर पडणारा धूर यामधून वायु प्रदूषण होत असते. या सर्वाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असतो. कार्यक्रमाचे
अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले, प्रदूषण ही एक गंभीर जागतिक समस्या बनलेली आहे. त्यामुळे
सर्वांनी स्वच्छ हवा ठेवण्यासाठी आरोग्यदायी आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी सेंद्रिय कचऱ्यांचे व्यवस्थापन, समाजामध्ये जाऊन स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे, सर्वांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे, झाडांचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगणे, सरकारचा एक पेड माँ के नाम या उपक्रमांमधून पर्यावरण संवर्धन निश्चितपणे होते. हरित अच्छादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे शहरामध्ये नगर वाटिका निर्माण करणे या उपाययोजना आहेत. अशा उपाययोजने मधून वायूची गुणवत्ता सुधारेल. वायुची गुणवत्ता सुधारून पर्यावरणाचा ऱ्हास सुद्धा होणार नाही असे मत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार डॉ. संतोष रायबोले यांनी मांडले. कार्यक्रमासाठी प्रा. संतोष आखाडे, प्रा. डॉ. बाजीराव डाफळे, प्रा. रूपाली पाटील, प्रा. पल्लवी साटम उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी ह्यांनी या कार्यक्रमाला शुभेछया दिल्या.
