You are currently viewing सुनेत्राताई पवार यांच्याकडे सिंधुदुर्गातील शेतकरी प्रश्न मांडले

सुनेत्राताई पवार यांच्याकडे सिंधुदुर्गातील शेतकरी प्रश्न मांडले

सुनेत्राताई पवार यांच्याकडे सिंधुदुर्गातील शेतकरी प्रश्न मांडले

नारळ-सुपारी पिकांच्या नुकसानभरपाईसह पक्षसंघटनेबाबतही सविस्तर चर्चा; सकारात्मक प्रतिसाद

डिचोली (गोवा) : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी डिचोली, गोवा येथे कार्यक्रमानिमित्त भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तसेच नारळ व सुपारी पिकांच्या नुकसानभरपाईबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रश्नांबाबत निवेदनही सुनेत्राताई पवार यांच्याकडे सादर करण्यात आले.
या भेटीदरम्यान सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, पिकांचे नुकसान आणि नुकसानभरपाईच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षसंघटनेबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सुनेत्राताई पवार यांनी मांडण्यात आलेल्या विषयांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुरेश गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मेघेंद्र देसाई, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष दीपक देसाई आणि सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष विजय कदम उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा