सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
राज्यातील दिनांक 31 मे 2026 रोजी रिक्त असलेल्या 2912 इतक्या महसूल सेवकांची (कोतवाल) रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. सांगली जिल्ह्यात महसूल सेवकांची एकूण 354 पदे असून 287 पदे भरलेली आहेत, तर 67 पदे रिक्त आहेत. या पदभरतीची प्रक्रिया निश्चित कालबद्ध कार्यक्रमानुसार 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडण्याचे निर्देश महसूल व वन विभागाच्या वतीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
कोतवाल परीक्षा 2026 च्या कार्यक्रमानुसार तालुकानिहाय रिक्त जागांची यादी बनविण्याचा कालावधी 2 ते 8 सप्टेंबर 2026, रिक्त जागेनुसार बिंदू नामावली तयार करणे 9 ते 23 सप्टेंबर 2026, परीक्षा भरतीकरिता समिती स्थापना 24 सप्टेंबर 2026, जाहिरातीचा दिनांक 2 ऑक्टोबर 2026 (गांधी जयंती) ते 17 ऑक्टोबर 2026. अर्जांची छाननी 18 ऑक्टोबर 2026 ते 1 नोव्हेंबर 2026, प्रवेशपत्र उपलब्ध 4 ते 10 नोव्हेंबर 2026, परीक्षा दिनांक 11 नोव्हेंबर 2026, उत्तरसूची आणि निकाल घोषणा 12 नोव्हेंबर 2026, दस्तऐवज पडताळणी 13 ते 27 नोव्हेंबर 2026, नियुक्तीपत्र 28 नोव्हेंबर 2026
