प्रा. सतीश बागवे यांच्या पुढाकाराने स्वच्छता दूत व कष्टकरी ज्येष्ठ महिलांसाठी मदतीचा हात*
*सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे शिधा वाटप आणि मोफत मेडिकल कॅम्प*
सावंतवाडी
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्यामार्फत डॉ. हर्ष ईश्वरा साळगावकर यांच्याकडून स्वच्छता दूत यांची मोफत आरोग्य तपासणी,रक्त तपासणी तसेच धनुर्वाद प्रतिबंधक लस टोचणी करण्यात येणार आहे.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सावंतवाडी आयोजित
नगरपरिषद व हॉस्पिटल सावंतवाडी शहर स्वच्छता दूतांसाठी तसेच गावातील कष्टकरी भाजी विक्रेत्या ज्येष्ठ महिलांसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिधा वाटप व मोफत मेडिकल कॅम्पचे आयोजन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती निसर्गप्रेमी मा. प्रसाद गावडे (रानमाणूस) तसेच सावंतवाडी शहरातील गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध डॉ.उमेश मसुरकर डॉ. हर्ष ईश्वरा साळगावकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे .
सदर कार्यक्रम 7 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजता गोविंद चित्रमंदिरच्या हॉलमध्ये होणार आहे तसेच स्वच्छता दूतांसाठी मेडिकल कॅम्प त्याच ठिकाणी ठीक 3 वाजता सुरू करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सल्लागार व उद्योजक शैलेशजी पै,अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, उपाध्यक्ष प्रा.शैलेश नाईक, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सचिव समीरा खलील, खजिनदार रवी जाधव रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम यांनी केले आहे तर संस्थेचे सदस्य हेलन निबरे, शामराव हळदणकर, वकील अशोक पेडणेकर, शेखर सुभेदार, शरदिनी बागवे,सुजय सावंत, प्रा.प्रसाद कोदे, शरद पेडणेकर यांचे देखील सहकार्य लाभले.
या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ समाजसेवकांचा हि सत्कार करण्यात येणार आहे तरी सदर कार्यक्रमाला नगरपरिषद व हॉस्पिटल मधील स्वच्छता आणि उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे यांनी केले आहे.
