You are currently viewing साळगाव महाविद्यालयात संगीतमय शिक्षक दिन साजरा..!

साळगाव महाविद्यालयात संगीतमय शिक्षक दिन साजरा..!

साळगाव महाविद्यालयात संगीतमय शिक्षक दिन साजरा..!

कुडाळ

जगन्नाथ संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगाव येथे शिक्षक दिनानिमित्त संगीत कला व वाद्यवादन मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे मार्गदर्शक श्री. धनंजय सावंत (तबला अलंकार, पखवाज विशारद, संगीत एम.ए.) यांनी विद्यार्थ्यांना संगीत कला, तबला, मृदंग व पखवाज वादनाची सखोल माहिती प्रात्यक्षिकांसह दिली.
या वेळी हार्मोनियम विशारद व सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री. अमित उमळकर, कुमार हर्ष सावंत व श्री. पुंडलिक सावंत यांनी सुरेल संगीतसाथ केली.
विद्यार्थ्यांमध्ये संगीत कलेची आवड निर्माण व्हावी, भारतीय संगीत परंपरेची ओळख व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास श्री. लक्ष्मीनारायण विद्यालय, बीबवणेचे मुख्याध्यापक श्री. भास्कर पारधी आपल्या विद्यार्थ्यांसह उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनानिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.सचिन पाटकर होते. अध्यक्षीय भाषणात यांनी, “ध्यान-साधना हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्यांनी तो अनुभवला पाहिजे. अशा सांस्कृतिक अनुभवातूनच विद्यार्थ्यांची सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उत्क्रांती घडते,” असे प्रतिपादन केले. यावेळी प्रा. स्वप्नाली सिंगनाथ प्रा. समीक्षा परब हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामदास पास्ते यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. नितीन ढेकळे यांनी केले.

🎵 संगीताच्या सुरांनी शिक्षक दिनाला लाभली सांस्कृतिक समृद्धी आणि ज्ञानाची नवी दिशा..! 🎵

प्रतिक्रिया व्यक्त करा