ज्येष्ठ साहित्यिका नीरजाजी
दि डहाणू एज्युकेशन ट्रस्टच्या के.एल.पोंदा.हायस्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त
बालभारतीच्या पानांतून प्रत्यक्ष भेटीपर्यंत!साहित्यिक आपल्या भेटीला
शाळेच्या उपक्रमशिल शिक्षिका सौ.अनुपमा जाधव यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.तरुणजी पोंदा सर, उपाध्यक्ष मा. श्री.अजयजी बाफना सर,मानद सचिव मा. सुधीरजी कामत सर, विश्वस्त मा.श्री.रोहित भन्साळी सर, विश्वस्त, कार्यकारिणी, पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन देऊन, शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव मा.श्री.सुधीरजी कामत सर, ज्येष्ठ साहित्यिका नीरजाजी, शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.रसिका घागस मॅडम, उपमुख्याध्यापक मा.श्री.सुनील मोरे सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा.सौ.वर्षा राऊत मॅडम, पर्यवेक्षिका मा.सौ.मनिषा पटेल मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.सौ.रसिका घागस मॅडम यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिका नीरजाजी यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण विषयक कार्यावर प्रकाश टाकून ,शिक्षणाचे महत्त्व सांगितले.टिळक , आगरकर व्हायचं असेल तर प्रथम विचार करायला, प्रश्न विचारणे महत्त्वाचे आहे, तसेच इयत्ता १०वी मराठीच्या पाठ्यपुस्तकात त्यांची आश्वासक चित्र या कवितेबद्दल, लेखनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.स्त्री पुरुष समानता महत्वाची आहे.आजही वर्तमानात मुलींच्याकडून अपेक्षा जास्त आहेत.तसेच सती सावित्रीच्या कथेतून पुरुष प्रधान संस्कृतीवर प्रकाश टाकला. धर्म म्हणजे काय , उत्सव करणे म्हणजे काय हे सांगून साने गुरुजींची खरा तो एकची धर्म ही प्रार्थना तिचा अर्थ लक्षात घ्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुधीरजी कामत सर यांनी विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन करणे गरजेचे आहे. एखाद्या विषयावर वकृत्व करायचं असेल तर त्यासाठी त्या विषयाची माहिती हवी. विविध पुस्तक वाचली पाहिजे. जसे संविधानाचे वाचन केले. तर आपणास त्यातील उपयुक्त माहिती मिळते. अशा उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. असे सांगून विविध उदाहरणातून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आनंदाचे वातावरण निर्माण करुन हास्याचे फवारे पसरवले.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी,प्रा.श्री. विक्रमसिंग राजपूत सर,सौ.मनिषा गोसावी मॅडम, श्री.चंद्रकांत खुताडे सर,श्री.बाळासाहेब चव्हाण सर,श्री.तुषार मडवे सर, श्री . सुनील मोरे सर यांचे सहकार्य लाभले.
सुत्रसंचलन सौ.शीला सुरती यांनी केले. तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका सौ.वंदना कांकड यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थी आनंदीत झाले.
