*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी प्रा सत्यवान शांताराम घाडी लिखित अप्रतिम गवळण*
*कृष्ण सखा*
**********
कालिया मर्दन कराया गेला पाठीराखा
पंचमुखी शीरी नाचे माझा कृष्ण सखा।।धृ।।
यमुनेचे जळ विषारी केले कालियाने
पशु,पक्षी ,जन मरू लागले विषाने
पारावर उरला नाही यमुना दुःखा
पंचमुखी शीरी नाचे माझा कृष्ण सखा।।धृ।।
कुंदक निमिष मात्र ,कृष्ण पाण्या जाई
कालिया शिकविण्या धडा केली चढाई
घायाळ केले त्यासी लाथा मारूनी मुखा
पंचमुखी शीरी नाचे माझा कृष्ण सखा।।धृ।।।२।।
कालियाच्या फनावर नाचतो श्री रंग
नृत्य त्याचे पाहताना राधा झाली दंग
राधेस भुलवीतो मोहन प्राणसखा
पंचमुखी शीरी नाचे माझा कृष्ण सखा।।धृ।।३।।
गोकुळात साऱ्या झाला हो मोठा आनंद
कृष्ण वृंदावनी पसरवी मकरंद
साऱ्या जीवांचा झाला मोहन पाठिराखा
पंचमुखी शीरी नाचे माझा कृष्ण सखा।।धृ।।४।।
**************************************
*रचनाकार :-*.प्रा.सत्यवान शांताराम घाडी.
*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.
*ठाणे:-* दिवा
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
