*मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गोविंदा रे गोपाळा*
लय लय भारी नादच खुळा
नंदाचा कान्हा रंगाने काळा
लय लय भारी नादच खुळा
राधेच्या संगे कान्हा खेळे झुला
लय लय भारी नादच खुळा
कान्ह्याच्या पाव्याचा सर्वांना लळा
लय लय भारी नादच खुळा
रास तो रंगतो गोपी झाल्या गोळा
लय लय भारी नादच खुळा
दही दूध लोण्यावर कान्हाचा डोळा
लय लय भारी नादच खुळा
दहीहंडी फोडतो गोपाळांचा मेळा
लय लय भारी नादच खुळा
गोपाळांचा काला गोड गोड झाला
गोविंदा रे गोपाळा
यशोदेच्या तान्ह्या बाळा
गोविंदा रे गोपाळा
यशोदेच्या तान्ह्या बाळा
– अरुणा गर्जे
सांगली
