श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये पाच दिवसीय अध्यापक विकास क्षमता कार्यक्रम संपन्न.
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी मध्ये पाच दिवसीय अध्यापक विकास क्षमता कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सहाय्यक संचालक अॅड . शामराव सावंत,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल,कार्यशाळेचे समन्वयक डॉ.डी बी शिंदे, डॉ.यूसी पाटील,डॉ. वाय ए चौधरी, डॉ. व्ही टी अपराध, डॉ. एस एम बुवा,
वेस्टर्न रीजनल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर मुंबईचे सुधीर कुमार, मीनल ताम्हणकर, सरिता थोपटे, गोविंद चिट्टे,मिलिंद शिद्रुक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचा प्राध्यापक वर्ग प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर तसेच संशोधन करणारे विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले या पाच दिवसीय कार्यशाळेमुळे महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना विविध उपकरणे दुरुस्त करणे त्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करणे यासाठी खूप मोठी मदत झाली.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयामधून आलेले शिक्षक व कर्मचारी यांनाही उपकरणांची तांत्रिक माहिती मिळाली व उपकरणे दुरुस्त करून देण्यात आली याबद्दल त्यांनी वेस्टर्न रिजनल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर यांच्या तज्ञ ऑफिसरांचे आभार व्यक्त केले.
कार्यशाळेचे समन्वयक डॉ. डी बी शिंदे यांनी पाच दिवस चाललेल्या कार्यशाळेचा आढावा घेतला.यामध्ये एकूण 110 उपकरणे दुरुस्त करून देण्यात आली यामुळे सर्वच महाविद्यालयांना याचा फायदा झाला व उत्तम प्रकारचे ट्रेनिंग मिळाले असे त्यांनी सांगितलं. सहभागी झालेल्या प्राध्यापकांपैकी डॉ. केशव पाखरे, रावराणे कॉलेज वैभववाडी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले या कार्यशाळेमुळे अनेक प्रयोगशाळा उपकरणे त्याची कार्यप्रणाली त्याचे पार्ट्स याची योग्य माहिती मिळाली ज्यामुळे भविष्यामध्ये आम्ही आमची उपकरणे स्वतः हाताळू शकतो व दुरुस्त पण करू शकतो.याबद्दल आम्हाला आत्मविश्वास निर्माण झाला. उपस्थित तांत्रिक अधिकारी सौ. मिनल ताम्हणकर यांनी महाविद्यालयाच्या वतीने आमची खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था केली त्यामुळे पाच दिवस आम्हाला या कार्यशाळेमध्ये ट्रेनिंग द्यायला खूप सोपे झाले. प्राचार्य,शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तम प्रकारचे सहकार्य दिले असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.शामराव सावंत यांच्या हस्ते सर्व सहभागी प्राध्यापक व कर्मचारी यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. युसी पाटील यांनी केले व आभार मानले.
