You are currently viewing मडूरेतील आगीत जीवन प्राधिकरणची पाईपलाईन जळून लाखो रुपयांचे नुकसान

मडूरेतील आगीत जीवन प्राधिकरणची पाईपलाईन जळून लाखो रुपयांचे नुकसान

बांदा

मडुरा डिगवाडी येथील जुन्या नाबर स्कूल समोरील भागात आज दुपारी अचानक आग लागली. यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनसाठी टाकलेले पाईप जळून खाक झाले. सावंतवाडी नगरपरिषदेचा अग्निशमन बंब उशिराने दाखल झाला. मात्र, तोपर्यंत आग आटोक्यात आली होती.

आग विझविण्यासाठी माजी उपसरपंच विजय वालावलकर, उल्लास परब, तलाठी कविटकर पोलीस पाटील नितीन नाईक, ऋषी खर्डे आदिनी प्रयत्न केला. मात्र दुपारची वेळ व वारा असल्याने आग विझविणे अशक्य झाले. या दुर्घटनेत जीवन प्राधिकरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेळीच आग विझवण्यात यश मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला

प्रतिक्रिया व्यक्त करा