You are currently viewing ११ आणि १३ सप्टेंबरला दादरहून कोकणासाठी धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; मंत्री नितेश राणेंची माहिती

११ आणि १३ सप्टेंबरला दादरहून कोकणासाठी धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; मंत्री नितेश राणेंची माहिती

११ आणि १३ सप्टेंबरला दादरहून कोकणासाठी धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; मंत्री नितेश राणेंची माहिती

*भाजपच्या मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधून तिकिटांचे बुकिंग

कणकवली;
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आग्रहाचा मान राखत पालकमंत्री नितेश राणे यांनी ‘मोदी एक्स्प्रेस’च्या प्रवासाच्या तारखेत बदल करण्याची घोषणा केली आहे. पूर्वी जाहीर केलेल्या तारखांऐवजी आता ११ आणि १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून ‘मोदी एक्स्प्रेस’ कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे. चाकरमान्यांनी भारतीय जनता पक्षाच्या मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधून आपल्या तिकिटांचे बुकिंग लवकरात लवकर करून घ्यावे, असे आवाहनही मत्स्य विकास व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी दरवर्षी सोडण्यात येणाऱ्या ‘मोदी एक्स्प्रेस’च्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. चाकरमानी आणि कोकणवासीयांनी केलेल्या आग्रहाचा मान राखत ११ आणि १३ सप्टेंबर रोजी ‘मोदी एक्स्प्रेस’ सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
यापूर्वी ‘मोदी एक्स्प्रेस’ ९ आणि ११ सप्टेंबर रोजी सोडण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी असंख्य चाकरमान्यांनी केली होती. त्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत आता ११ व १३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून या विशेष रेल्वे गाड्या कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहेत.
गणेशभक्तांनी नाचत-गात, भजनांच्या गजरात आणि उत्साहात कोकणात पोहोचावे, या उद्देशाने ‘मोदी एक्स्प्रेस’ची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवासासाठी इच्छुक चाकरमान्यांनी भाजपच्या मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधून तिकिटांचे बुकिंग लवकरात लवकर करून घ्यावे, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा