*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*लाकडाचा…घोडा..!*
एक दिलासा …हवा
पाठीवर कसलं ओझं नसावं
संस्कृतीच्या अदृश्य भिंतीवर चढून
आपल्याचं जखमांवर मीठ चोळावं
सैतानाला दया आली जरी
न लढता.. हात बांधून घ्यावे
अज्ञानाच्या दिव्याने ..अंधारात
जीर्ण ….परंपराना हुडकावे
कोणताही अविर्भाव न आणता
स्वतःला रूढींच्या माळेत गुंफावं
अन् कोरड्या.. डोळ्यांत पवित्र
गोठलेले गंगाजळ ..आणावं
श्रध्देचा दरवाजा बंद झाला जरी
आशेने….. तेथे थांबू नये
आले वांझपण जरी वाट्याला
लाकडाचा घोडा कधी करू नये
एक दिलासा… हवा
पाठीवर ..कसलं ओझं नसावं
बुध्दी..ज्ञान..विज्ञान..अभ्यास
या सोबतचं.. मरेपर्यंत जगावं..!
उभे पुढे… भविष्य तेजाळ
अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याची
हीच खरी….. सोनेरी वेळ..!!!
बाबा ठाकूर ठाकूरीउवाच
अंधश्रद्धेवर समिक्षा सादरीकरणाची
