ओझर – नाशिक / (बबनराव आराख) :
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लिखाण करणारे, ‘शोध सुखाचा’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक अनिल भगवान चव्हाण (ABC) येवता ता. चिखली जि. बुलढाणा यांना नुकतेच ‘आजीच पुस्तकाच हॉटेल’ ओझर नाशिक येथे राज्यस्तरीय समाज वैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..बीएसएफ बहूउद्देशीय संस्था व संत कबीर संस्था द्वारे आयोजित राज्यस्तरीय कवीसंमेलनात ‘राज्यस्तरीय समाज वैभव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना अशोक कुमावत राष्ट्रपती पुरस्कार विजेते लेखक, सौं. कांचन जाधव (प्रसिद्ध निवेदिका) पौर्णिमा झाल्टे (अभिनेत्री) आयोजक भूषण सरदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अनिल चव्हाण यांना मिळालेला हा चौथा पुरस्कार असून मराठी साहित्य विश्वात त्यांच नाव प्रचंड गाजत आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
