उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते शामला पंडित यांच्या ‘मधुकुंज’चे प्रकाशन
बालगंधर्व रंगमंदिरात १८व्या सचित्र व रंगीत कवितासंग्रहाचे प्रकाशन; साहित्य क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव
पुणे :
बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात कवयित्री शामला रामचंद्र पंडित (दीक्षित) यांच्या १८व्या पुस्तकाचे, ‘मधुकुंज’ या सचित्र व रंगीत कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मा. सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते हे प्रकाशन संपन्न झाले.
‘मधुकुंज’ हा विविध काव्यप्रकारांचा समावेश असलेला सचित्र व रंगीत कवितासंग्रह असून, पुस्तकाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे शुभेच्छापत्र लाभले आहे. ज्येष्ठ साहित्यिक व ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांनी पुस्तकाला आशयघन व प्रासादिक प्रस्तावना दिली आहे.
तसेच दत्तात्रय अत्रे (राजज्योतिषी व लेखक), कल्याण पानगे (माजी शिक्षणाधिकारी), शारदा पानगे (अध्यापिका, लेखिका व कवयित्री) आणि कविता खुटवड (अध्यापिका, श्री म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी) यांनी पुस्तकास शुभेच्छा दिल्या आहेत.
‘मधुकुंज’च्या निर्मितीमध्ये विविध मान्यवरांचे योगदान लाभले. सोनाली दीपक मोरे यांनी पुस्तकाचे लेआउट केले असून दीपक मोरे यांनी उत्कृष्ट पुस्तक बांधणी केली. कु. प्रणाली पंडित यांच्या प्रणाली प्रकाशन, पुणे यांच्या माध्यमातून पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. तसेच श्री. दराडे यांनी पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ व मलपृष्ठ साकारले आहे.
या प्रकाशन सोहळ्यास महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदिप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांच्यासह सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सविता नाणेकर, उपाध्यक्ष डॉ. विलास वाणी, सचिव बंडू दातीर, खजिनदार चंद्रशेखर वाघमारे, अनिल देवकाते, सेवक कल्याण निधीचे अध्यक्ष डॉ. तुषार शितोळे, सचिव श्रीहरी लवांडे, ग्राहक संस्थेचे अध्यक्ष संतोष पठारे व सचिव अनिल जाचक उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या विविध शाखांतील प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, अध्यापकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शामला पंडित यांच्या साहित्यिक वाटचालीतील १८व्या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत झालेले प्रकाशन हा साहित्य क्षेत्रासाठी आनंदाचा क्षण ठरला.
