फोंडाघाट ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे; ग्रामस्थांची मागणी
फोंडाघाट :
फोंडाघाट परिसराचा झपाट्याने होत असलेला विकास, वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरी गरजा लक्षात घेता फोंडाघाट ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यात यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
फोंडाघाट हे परिसरातील महत्त्वाचे व्यापारी व शैक्षणिक केंद्र असून, दिवसेंदिवस येथे नागरिकांची वर्दळ वाढत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पथदिवे, वाहतूक व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांवर वाढत्या लोकसंख्येचा ताण जाणवत आहे.
नगरपंचायत झाल्यास उपलब्ध होणाऱ्या अधिक प्रशासकीय सुविधा आणि विकासनिधीच्या माध्यमातून शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळू शकते. त्यामुळे फोंडाघाटच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
फोंडाघाटला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यास परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.आज ग्रामपंचायतीची ग्राम सभा होती.ती अपेक्षित कोरम नसलेने 8 सप्टेंबर रोजी घेण्याचे ठरले.तरीही चर्चेत फोंडाघाट नगरपंचायत व्हावी.असे ठरले.अजित.नाडकर्णी माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी दुजोरा दिला.आणि शासन दरबारीं याची मागणी करूया.असे ठरले.या अगोदर तालुक्याची मागणीही केली होती त्यालाही त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता.*
