You are currently viewing सावंतवाडीत मालवाहू गाडीचे चार डबे सुटले; मोठी दुर्घटना टळली

सावंतवाडीत मालवाहू गाडीचे चार डबे सुटले; मोठी दुर्घटना टळली

सावंतवाडी

गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कोळसावाहू मालवाहू गाडीचे चार डबे सुटून स्टेशनवर राहिले. दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्टेशनपासून अलिकडे या गाडीच्या काही लोखंडी पट्टी खांबाला अडकून मोठा आवाज झाला. त्यानंतर चार डबे सुटले. या डब्यांच्या मागे गार्ड केबिनही नव्हती. या घटनेनंतर गाडी थांबविण्यात आली. रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानी डबे जोडून गाडी पूर्ववत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा