You are currently viewing सावंतवाडीत दोन दिवशीय रानभाज्या , महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

सावंतवाडीत दोन दिवशीय रानभाज्या , महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

सावंतवाडीत दोन दिवशीय रानभाज्या , महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

महिला व बालकल्याण समितीचा पुढाकार नैसर्गिक रानभाज्या व गावठी वस्तूंना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात महिला व बालकल्याण समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशीय रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सवाचा शुभारंभ नगराध्यक्ष सौ श्रद्धा सावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आला महोत्सवाच्या पहिल्या दिवशी स्थानिक नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला महोत्सवाचे आयोजन महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांनी केले होते
पावसाळ्यात निसर्गात नैसर्गिक रित्या उगवणाऱ्या औषधी व पौष्टिक रानभाज्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी तसेच त्यांच्या आरोग्यदायी गुणधर्माबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने 25 व 26 ऑगस्ट रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांनी विविध स्टॉलला भेट देत विक्रेत्यांशी संवाद साधला त्यांनी रानभाज्यांची माहिती जाणून घेतली तसेच स्वतः गावठी भाज्यांची खरेदी करून या उपक्रमास प्रोत्साहन दिले
पावसाळ्याच्या दिवसात डोंगराळ व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांना पारंपारिक आहारामध्ये महत्त्वाचे स्थान आहे मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे नव्या पिढीला या नैसर्गिक खाद्यपदार्थांची माहिती कमी होत आहे ही परंपरा जतन करण्याबरोबरचं रानभाज्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या महत्त्वाच्या माध्यमातून करण्यात येत आहे महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्या तसेच स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या गावठी वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले आहेत या स्टॉलला नागरिकांनी भेट देऊन स्थानिक उत्पादने व रानभाज्यांची खरेदी करावी असे आवाहन महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर व नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे या उपक्रमामुळे ग्रामीण महिला स्थानिक विक्रेत्यांना बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच नागरिकांना पारंपारिक पौष्टिक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थांची ओळख होण्यास मदत होत आहे यावेळी महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर नियोजन सभापती आनंद नेवगी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर उपसभापती सुनीता पेडणेकर नगरसेविका दुलारी रांगणेकर नीलम नाईक सुकन्या टोपले शर्वरी धारगळकर स्नेहा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा