You are currently viewing खनिकर्म मधून साटेली-भेडशी आरोग्य केंद्राला मिळणार रुग्णवाहिका

खनिकर्म मधून साटेली-भेडशी आरोग्य केंद्राला मिळणार रुग्णवाहिका

– बाबूराव धुरी

पालकमंत्री भेट देत करणार पाहणी

दोडामार्ग

अनेक वर्षांपासून साटेली भेडशी येथील आरोग्य केंद्रात रूग्णवाहीका नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. शिवसेना तालुका प्रमुख पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी यांनी याची दखल घेतली. येत्या पंधरा दिवसांत सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे दोडामार्ग तालुक्यात येणार आहेत. यावेळी साटेली भेडशी येथील आरोग्य केंद्र इमारतीची पाहणी करणार आहेत. यावेळी खनिकर्म निधीतून खरेदी केलेली रुग्णवाहिका साटेली भेडशी आरोग्य केंद्राला दिली जाणार आहे, अशी ग्वाही बाबुराव धुरी यांनी दिली. साटेली भेडशी हे तालुक्यातील मोठे आरोग्य केंद्र आहे येथे मोठ्या प्रमाणावर रूग्ण उपचारासाठी येतात. आजूबाजूची गावे ही डोंगराळ भागात असून त्याठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − ten =