You are currently viewing गॅस सिलिंडर आणण्यासाठी जाताना महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

गॅस सिलिंडर आणण्यासाठी जाताना महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

गॅस सिलिंडर आणण्यासाठी जाताना महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मळगाव देऊळवाडी येथील सुमित्रा मळगावकर यांचे दुर्दैवी निधन

सावंतवाडी :

मळगाव देऊळवाडी, ता. सावंतवाडी येथील सौ. सुमित्रा दशरथ मळगावकर (वय ६३) यांचे सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गॅस सिलिंडर आणण्यासाठी त्या आपल्या पुतणीसोबत जात असताना अचानक घसरून पडल्या. त्यानंतर त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.
या घटनेमुळे मळगावकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, पुतणी, पुतण्या तसेच अन्य नातेवाईक असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
ही माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा