You are currently viewing “स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांनी डिजिटल शिक्षणाची कास धरावी” — रो. मकरंद नाईक

“स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांनी डिजिटल शिक्षणाची कास धरावी” — रो. मकरंद नाईक

“स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांनी डिजिटल शिक्षणाची कास धरावी” — रो. मकरंद नाईक

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावमध्ये ४५ विद्यार्थ्यांना एज्युकेशन अ‍ॅपचे वितरण

साळगाव :

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली व रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव येथे इयत्ता दहावीच्या ४५ विद्यार्थ्यांना एज्युकेशन अ‍ॅपचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक म्हणाले, “आजचे युग हे स्पर्धेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ज्ञान व कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. एज्युकेशन अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची नवी दिशा मिळेल आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना निश्चितच मदत होईल.”

रो. गीता गोवेकर यांनी एज्युकेशन अ‍ॅपचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी त्याचा नियमित वापर करून अभ्यासाबरोबरच आपल्या वैयक्तिक गुणांचा व कौशल्यांचा विकास करावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावचे अध्यक्ष श्री. मुकुंद धुरी, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक, रो. गीता गोवेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सलीम तकिलदार, सहाय्यक शिक्षिका सौ. अर्चना चव्हाण, सहाय्यक शिक्षक श्री. एकनाथ कांबळे, श्री. विद्यानंद पिळणकर, श्री. परशुराम नार्वेकर आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक श्री. सलीम तकिलदार यांनी प्रास्ताविकातून रोटरी क्लबच्या या शैक्षणिक उपक्रमाचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक श्री परशुराम नार्वेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा