You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल दिन साजरा.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल दिन साजरा.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल दिन साजरा.

सावंतवाडी

भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस 12 ऑगस्ट हा ‘ग्रंथपाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी ( स्वायत्त) येथे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले, प्रा. डी. टी. देसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, ग्रंथपाल आर. के. शेवाळे, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा