*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. संध्या कुलकर्णी यांची स्वादिष्ट पाककृती*
*दिंड फ्राय*
*साहित्य-:*
हरबराडाळ 1/2 वाटी, मुगडाळ 1/2 वाटी, हि मिरची, आलं, कडीपत्ता, कोथिंबीर,पुदिना,हिंग,हळद मीठ, कणिक, तुप.
*कृती-:*
कणिक मळुन ठेवणे.दोन्ही डाळी 4 तास भिजवून घ्या.नंतर मिक्सरला वाटून घेताना त्यात आलं, हि मिरची,कडीपत्ता, कोथिंबीर व मीठ घालून पाणी न घालता वाटून घ्या थोडे घट्टच पाहिजे.नंतर कणकेचा गोळा घेऊन पुरीसारखे लाटून त्यात हे सारण भरून करंजीसारखे बंद करून कात्रण करून करा .अशी सगळी दिंड तयार करून गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळवून वर चाळणीला आतुन तेल लावून ही दिंड ठेवून वर झाकण लावून छान वाफवून घ्या. दिंड गार झाले की कट करून घ्या नंतर कढईत तूप घालून त्यात जिरे तीळ घालून त्यात हे दिंड फ्राय करा मस्त कुरकुरीत करून सॉस बरोबर खाण्यास द्या. लहान मुलेही आवडीने हे खातील ..प्रोटीन युक्त आहे. डायबिटीस वाल्यांनाही डाएट वाल्यांनाही खाता येईल. नुसते खाऊ शकता मस्त लागते. ..😊👍
*टीप*- इतर वेळी ह्यात गाजर, कोबी वगैरे किसून डाळीत मिक्स करून सारण करू शकता.वरून चीज किसूनही घालू शकता .मुले आवडीने खातील.
*सौ. *संध्या कुलकर्णी*…*सातारा*
